मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत ; पदवीधरांनी व शिक्षकांनी त्वरित नोंदणी करावी : जिल्हाधिकारी

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा : शिक्षक व पदवीधर मतदार  नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामधील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा व्हीसीद्वारे घेतला. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व प्रांत अधिकारी तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व  कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणी  पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. यासाठी प्रांताधिकारी यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची  तात्काळ बैठक घ्यावी. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील  महाविद्यालयांची मदत घ्यावी. तसेच बरेच शिक्षक ही पदवीधर आहेत त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी,अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंगभूत कलागुणांना व्यवसायिकतेचे रूप द्या
पुढील बातमी
शाहूनगर, गोळीबार, गोडोली परिसरातील पाणीप्रश्न तातडीने सोडवा

संबंधित बातम्या