भूविकास बँक चौक परिसरात आर्थिक वादातून दोन गटांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी दाखल

by Team Satara Today | published on : 20 June 2026


सातारा : पूर्वी झालेल्या वाहन अपघाताच्या तडजोडीतील उर्वरित रकमेच्या वादातून भूविकास बँक चौक परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन अपघाताच्या तडजोडीनुसार ठरलेल्या रकमेतून काही रक्कम देण्यात आली होती. उर्वरित सात हजार रुपयांच्या मागणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या असून शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लिंब गावात बैठकीदरम्यान अपंगत्वावरून अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पुढील बातमी
शाहूनगर परिसरातील एका निवासी फ्लॅटचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास

संबंधित बातम्या