पुणे : पुणे मेट्रोतील सर्वात महत्वाचा टप्पा रविवारी सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने पुणे मेट्रोच्या या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर दुपारी चार वाजेपासून पुणेकरांचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रवास मेट्रोने सुरु झाला. मेट्रोच्या या प्रवासाचा सुखद अनुभव पहिल्याच दिवशी अनेक पुणेकरांनी घेतला. भव्य दिव्य अंडरग्राऊंड मेट्रो स्थानक, फुलांनी सजवलेले स्थानके, प्रवाशांचे होणारे स्वागत आणि सर्वात महत्वाचे पुण्यातील वाहतूक कोंडीत स्वारगेट ते शिवाजी नगर पोहचण्यास लागलेला दहा मिनिटांचा वेळ…पुणे मेट्रोतील शिवाजीनगर ते स्वारगेट मार्ग सुरु झाल्यामुळे दहा मिनिटांत हा प्रवास होत आहे. आम्ही स्वारगेटवरुन शिवाजीनगरात दहा मिनिटांत पोहचू, असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असे एका पुणेकराने सांगितले. स्वारगेट ते शिवाजीनगर रस्ते वाहतुकीने ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो.
पुणे मेट्रोचा स्वारगेट प्रवास अंडरग्राऊंड आहे. या मेट्रोत बसल्यानंतर अनेकांनी फोटो, व्हिडिओ घेतले. मंडईतून बसलेला पुणेकर म्हणला, सेल्फीसाठी मोबाईल काढला. फोटो घेण्यास सुरुवात केली अन् शिवाजीनगरात पोहचला. मंडईमधील गर्दीतून अवघ्या चार, पाच मिनिटांत शिवाजीनगर गाठणे एक स्वप्नावत होते. पुण्यातील हा मेट्रो मार्ग अंडरग्राऊंड असल्यामुळे काही ठिकाणी मोबाईलची रेंज जात असल्याचा अनुभव काही प्रवाशांनी सांगितला. त्यामुळे या ठिकाणी वायफाय करायला हवी, अशी सूचनाही केली.
स्वारगेटहून मंडईत येणाऱ्या नागरिकांना आता शेअर रिक्षाच्या भाडेदरात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. स्वारगेट ते मंडईसाठी केवळ 10 रुपये लागणार आहे. स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांना अवघ्या 30 रुपयांत प्रवास करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
पुणे मेट्रोचे काम महामेट्रोने केले. महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग होते. आता त्यांची कामे पूर्ण झाली आहे. या मार्गावरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठलीही अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |