वाढदिवस, लग्न समारंभ, साखरपुडा किंवा इतर कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी घरात केक आणला जातो. केक आणून सेलिब्रेशन केले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक उपलब्ध आहेत. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, मँगो इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक आणले जातात. त्यातील सगळ्यांचा आवडीचा केक म्हणजे चीजकेक. घरातील प्रत्येक व्यक्तीला चीजकेक खायला खूप आवडतो. चीज आणि बेरीजचा सॉस तयार करून बनवलेला केक चवीला अतिशय सुंदर लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हनचा वापर न करता चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चीज केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज लागत नाही. बऱ्याचदा लहान मुलं सतत केक खाण्यास मागतात. अशावेळी मुलांना नेहमीच बाहेरून विकत आणलेला केक खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवलेला केक द्यावा. चला तर जाणून घेऊया चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
डायजेस्टिव्ह बिस्किटे
लोणी
क्रीम चीज
कंडेन्स्ड मिल्क
लिंबाचा रस
व्हॅनिला एसेन्स
फळांचा जाम
फळे
चॉकलेट सॉस
किसलेले चॉकलेट
कृती:
चीजकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बिस्कीट टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर बिस्कीट पावडर वाटीमध्ये काढून त्यात वितळवून घेतलेले लोणी टाकून मिक्स करा.
मोठ्या बेकिंग ट्रेच्या तळाला बटर पेपर लावा. त्यावर वरून बिस्किटाचे तयार केलेले सारण टाकून व्यवस्थित सेट करून घ्या. लावून घेतलेला थर एकसमान झाल्यानंतर फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
मोठ्या भांड्यात क्रीम चीज घेऊन इलेक्ट्रिक बीटर किंवा व्हिस्कच्या मदतीने चीज गुळगुळीत करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
नंतर त्यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला एसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित एकसमान करावे.
फ्रिजमधून तयार केलेला बेस काढून घ्या. वरून क्रीम चीज घालून व्यवस्थित सेट करा. स्पॅटुलाच्या मदतीने फिलिंग सगळीकडे पसरवा.
त्यानंतर रात्रभर केक सेट होण्यासाठी ठेवून घ्या. दुसऱ्या दिवशी तयार केलेल्या चीजकेकवर वेगवेगळी फळे आणि जॅम लावून केकचे तुकडे करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चीजकेक.