सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनांकडून पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना आदरांजली अर्पण करण्यात आली.शिवाय,हल्ल्याचा संबंध थेट पाकशी येत असल्याने जाहीर निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रकाश सावन्त होते.
धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलासराव कांबळे म्हणाले, "भारतसरकार पाक विरुध्द कार्यवाहीबाबत जे सूतोवाच करीत आहे.त्याबाबत परिणामाचा अभ्यास करावा.असे खा. शरदराव पवार यांनी सुचवल्याप्रमाणे मार्गक्रमण करावे.भाजप सरकार असतानाच पाक हल्ले करीत आहेत.त्याबाबतही विचार करणे गरजेचे आहे."
सध्याच्या घडामोडीबाबत संपूर्ण देश मोदी सरकारच्या पाठीशी आहे.तेव्हा त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे.मात्र, दूरगामी विचार करूनच प्रत्येक निर्णय घ्यावा.असे विचार अनेकांनी व्यक्त केले.यावेळी अनेक विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला.प्रथमतः सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे व मुरलीधर खरात यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.थेरो दिंपकर यांनी संपूर्ण विधी पार पाडला. यावेळी माजी प्राचार्य रमेश जाधव,सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने,संबोधी प्रतिष्ठानचे रमेश इंजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय बौद्ध महाभेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,महासचिव दिलीप फणसे,नंदकुमार काळे, तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे,अजित कांबळे, बाळकृष्ण कांबळे, वंचितचे ऍड. दयानंद माने, वसंत गंगावणे, खा. चंद्रशेखर आझाद पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक गाडे, मारुती भोसले, दिलिप सावंत,उत्तम पोळ, सुदर्शन इंगळे, अंकुश धाइंजे, सीताराम गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.