आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सुधीर पुंडेकर सुवर्णपदक विजेता

by Team Satara Today | published on : 18 June 2025


सातारा  : जागतिक अलिश बेल्ट रेसलिंग फेडरेशन, सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा धोरण मंत्रालय किरगीझस्थान यांच्या मान्यतेने "पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - 2025, इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान येथे 12 ते 15 जुन रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत  सातारा जिल्ह्याचा सुपुत्र पै.सुधीर पुंडेकर 80+वजन गटात भारतासाठी सुवर्णपदक व जागतीक विजेतेपदाचा पर्ल ऑफ किरगीझस्थान टायटलचा मानाचा बेल्ट जिंकला. या स्पर्धेत किरगिस्थान, उजबेकिस्तान, कजाकिस्तान, तुर्कमेनिस्थान, जपान, मंगोलिया श्रीलंका, थायलंड यासह अनेक देशाचा सहभाग होता.

मागील वर्षी एप्रिल 2024 रोजी ओश,किर्गिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुधीर पुंडेकर यांने 90kg वजन गटात भारत देशाला कांस्यपदकची कमाई करून दिली व 16 मे 2022 रोजी ओश,किर्गिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत 05 व्या स्थानावर राहिला.

मुळीकवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर पुंडेकरने  आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून 07 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे.  2017 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.

आंतरराष्ट्रीय कामगिरी

•जागतीक क्रमवारी मध्ये 05 व्या स्थानावर  : 

1) तुर्कमेनीस्थानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व

2)युनायटेड वर्ल्ड रेसलिंग - सीनियर बेल्ट रेसलिंग अलिश ग्रँड प्रिक्स 2022, बिश्केक, किर्गिस्तान कांस्यपदक 

3)Uww एशियन चॅम्पियनशिप ओश, 2022 किर्गिस्तान सहभाग

4) दक्षिण कोरियात झालेल्या वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टरशिप गेम्स स्पर्धेत सहभाग

5)बेल्ट रेसलिंग वर्ल्ड कप बेलारूस 2016

6) हंगेरी (बुडापेस्ट) येथे झालेल्या वर्ल्ड स्पोर्ट्स केम्पो 2019 स्पर्धेत सुवर्णपदक,रौप्यपदक 

7) बेलारूस येथील वर्ल्ड पॅक्रीशन चॅम्पियनशिपमध्ये 2018 कांस्यपदक

8) आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलींग कुस्ती स्पर्धा अझरबैजान कांस्यपदक 

9)  ग्रँड पिक्स इंटरनॅशनल बेल्ट रेसलिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2023 सहभाग

10) एशियन चॅम्पियनशिप जिजाक, उजबेकीस्थान 2023

90kg सहभाग

11)"पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव - 2023,इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान 

80+ कांस्यपदक : 

भारतामध्ये नवख्या बेल्ट रेसलींग या कुस्ती प्रकारात तो आपल नशीब अजमावून पहात आहे, सुधीर खेळत असलेल्या बेल्ट रेसलींग या कुस्ती प्रकाराला Uww 'जागतीक कुस्ती संघटनेची" व "ऑलम्पिक कांउसीयल    ऑफ एशिया' ची मान्यता आहे. 

आर्थीक अडचण असतानाही तो खचून न जाता एका ग्रामीन भागात राहुन तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत असतो, आलेल्या आडचनींच भाडवल न करता त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने यशप्राप्ती मिळवली आहे.आगामी  आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवन्याच त्याच स्वप्न आहे. व तो त्या दृष्टीने तो रोज कसून सराव करत आहे. दररोज जोर, सपाटे, लॉग रन, हील रन, बेल्ट रेसलींगचा सराव, टायर ओडने, कप्पीच्या साह्याने जड वजन ओढून, दोर चडने हे व्यायाम प्रकार करत आहे, उराशी बाळगलेल स्वप्न सत्यात उतरवन्यासाठी तो रोज स्वताच्या श्री शिव समर्थ क्रीडा संकुल मैदानावर घाम गाळत आहे, एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार कारन्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते कोट्यवधी रुपयांचा खर्च कराव लागतो तेव्हा आंतराष्ट्रीय खेळाडू तयार होतात. पण आपल्याला या सुविधा उपलब्ध झाल्या नाही म्हणून खचुन न जाता मीळेलत्या खुराकावर व खडतर सरावातुन आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकन्याच स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करत आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मुक्तार तांबोळी सर,नवल किशोर सर, कानोबीक सर किरगीझस्थान मार्गदर्शन लाभले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महावितरणच्या वर्धापनदिनाला विद्युत सुरक्षा अभियानाची जोड
पुढील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार

संबंधित बातम्या