सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि‌. 17 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड पेट्रोल पंपा शेजारी गाडा लावण्याच्या कारणावरून सरफराज आमिर बागवान रा. राजसपुरा पेठ सातारा, अरबाज अय्याज सय्यद आणि अय्याज रोनक सय्यद दोघे रा. करंजे पेठ, सातारा हे आपापसांत मारामारी व आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता बिघडवीत असताना आढळून आले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पवार करीत आहेत.



मागील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
मल्हार पेठेत सुमारे 37 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या