सातारा : नेत्र चिकित्सक विजय निकम सेवानिवृत्त होत असून त्याच दिवशी त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून अजातशत्रू असल्याचे सिद्ध केले आहे.असे गौरवोद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज कर्पे यांनी काढले.
येथील सूर्या बिल्डिंग, सेंट पॉल शाळेसमोर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वितरण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तेव्हा कर्पे यांच्या हस्ते फीत कापुन औपचारिक उद्घाटन करण्यात आले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.
डॉ.युवराज करपे म्हणाले," विजय निकम यांचा सर्व क्षेत्रातील लोकसंग्रह मोठा आहे. ३४ वर्षे त्यांनी सेवा केल्यानंतर भविष्यातही लोकपयोगी कार्य करतील. तेव्हा निकम यांनी स्वत:ची काळजी घेत लोकांचे तारणहार बनले पाहिजे."
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राहुल खाडे म्हणाले," निकम यांना मुळातच समाजसेवेची आवड आहे.तेव्हा आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी आपला राजकीय पटलावर करिष्मा दाखवावा."
सदरच्या कार्यक्रमास नेत्र शल्य चिकित्सक वर्ग-१ चे डॉ.चंद्रकांत काटकर,सिव्हीलचे डॉ.सुभाष कदम,नेत्रचिकित्सक अधिकारी पाटोळे व मुळे, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरचे शिबीर नेत्र अधिकारी विजय विठ्ठलराव निकम यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते.निकम सेवानिवृत्त झाले आहेत.त्याच दिवशी व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा कार्यक्रम घेऊन शेकडो रुग्णांवर उपचार करून नंदादीप हॉस्पिटल, सांगलीकडे दोन गाड्यांनी रवाना करण्यात आले.खरोखरच, समाजासाठीच्या बहुमोल कार्याचा गौरव करण्यासाठी आणि गरजू रुग्णांना नेत्रविकार उपचार व सेवा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वितरण करण्यात आले.या समाजोपयोगी उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी संजय नितनवरे,प्रकाश काशीळकर, ऍड.विलास वहागावकर,मिलिंद शिंदे,खंडागळे,विनायक,यादव,कर्मचारी,विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थीत होते.विठ्ठल भोईटे यांनी आभारप्रदर्शन केले.