सातारा, दि. १२ : साताराजिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल पुन्हा गतिमान झाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवारी राज्यातील 34 जिल्हा परिषदांची आरक्षण जाहीर केली आहेत यामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. तर पंचायत समिती सभापती पदासाठी प्रवर्गानुसार संख्या निश्चित केली असून सोडत काढली जाणार आहे ही पदे अडीच वर्षासाठी असणार आहे.
अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्ग महिलांची चाचपणी सुरू झाली आहे .सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाहीर केले आहे हे अध्यक्ष पद इतर मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.
11 पंचायत समिती सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे पूर्वीच्या आरक्षण रद्द झाले होते त्यामुळे नवीन कोणत्या आरक्षण पडणार याविषयी लक्ष लागून राहिले होते यावेळी ही ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठीच अध्यक्ष पद राखीव झाले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातीलदिलेला संधी मिळणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती पदासाठी प्रवर्गाच्या आरक्षण कसे राहणार हे स्पष्ट झालेले आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अधिक सभापती पदे आहेत. तर आत्ता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण हे अडीच वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी नवीन प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होईल.
जिल्ह्यातील सभापती पदांसाठी प्रवर्गानुसार आरक्षण संख्याही निश्चित झाली आहे त्यानुसार अनुसूचित जाती महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन सर्वसाधारण प्रवर्ग चार आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला दिन असे सभापती निवडले जाणार आहेत