रक्ताचे पाट वाहतील, पण इंचही जमीन देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात रणकंदन

by Team Satara Today | published on : 27 August 2026


कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून जमिनीची मोजणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात कडाडून विरोधाचा एल्गार पुकारला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी 'आरपारच्या लढाई'चा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या ठरावाच्या कारणातून जावळीत वाद मात्र नेते पुण्यात एकत्र; एकत्र दिसल्याने राजकीय भुवया उंचावल्या
पुढील बातमी
नेपाळमध्ये अडकलेल्या चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात राज्य सरकारला यश, उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या