तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्ये कलम १४४ जमावबंदी आदेश लागू

by Team Satara Today | published on : 03 May 2025


सातारा :   तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याचे व अंत्यवितरिकीचे आवर्तन दि. ८ एप्रिल २०२५ पासून चालु असून माण वाढीव कालव्याच्या मुखाशी आवश्यक विसर्ग मिळण्यासाठी एक ते दीड महिन्यापासून उरमोडी धरण विभाग व कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांना लेखी व तोंडी मागणी दिलेली असून देखील कमी जास्त प्रमाणात कालव्याच्या मुखाशी विसर्ग मिळत आहे.

सदर विसर्गामुळे माण वाढीव कालव्याचे आवर्तन पूर्ण करणे अडचणीचे होत आहे. त्यामूळे मागील आठ महिन्यापासून कालव्याच्या पुच्छभागाकडील गावांना आवर्तन काळात पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामूळे तेथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून मोठ्या संख्येने शेतकरी कालव्यावर जमा होत आहेत. तसेच गावागावातील वाद उफाळून येत असल्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. असेच यापूर्वीही सन २०२३-२०२४, सन २०२४-२०२५ च्या अवर्तनावेळी शेतकऱ्यांचे वाद झालेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांकडून कालवा अडवणे, कालवा फोडणे, यासारखे प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले आहेत. तसेच काही भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत मागील दोन वर्षे सातत्याने म्हसवड पोलीस स्टेशन मार्फत माण कालवा परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. कालव्याची सुरक्षितता व कालव्यावर शेतकऱ्यांचे वाद होऊ नयेत म्हणून सन २०२३-२४ मध्ये विभागीय कार्यालयाचे व या कार्यालयाचे पत्रानुसार 

 दि. ०१/०४/२०२४ अन्वये सदर कालव्यांच्या हद्दीमध्ये जमावबंदी आदेश लागू करणेबाबत उपविभागीय दंडाधिकारी माण खटाव उपविभाग, दहिवडी ता. माण यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी कालव्याच्या क्षेत्रामध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

महेश करचे यांनी दि. २१/४/२०२५ रोजी म्हसवड ता. माण तालुक्याच्या पूर्व भागास पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ जनावरांसह अर्धनग्न रास्ता रोको आंदोलन करणेबाबतचे निवेदन दिले, परंतू सदर प्रत्यक्ष जमावबंदी आदेश हे म्हसवड पासून साधारणत: १५ कि.मी. अंतरावर व फक्त कालव्याच्या क्षेत्रापूरते मर्यादीत असून त्याचा प्रभाव सदर आंदोलनाशी धरणे उचीत होणार नाही तसेच जमावबंदी आदेश हे खाली गावांना पाणी देत असताना वरील भागातील लोकांनी कालव्याचे पाणी वळवू अथवा चोरु नये, अगर कालव्याचे नुकसान करणेत येऊ नये. यासाठी लावण्यात आला असल्याचे, कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे विभाग क्रमांक २, करवडी यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे प्रथमच मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर
पुढील बातमी
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजनेंतर्गत ४२२ दांपत्यांना 2 कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान वाटप

संबंधित बातम्या