अयोध्या फाउंडेशन तर्फे कुरणेश्वर परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राबवला उपक्रम

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अयोध्या फाउंडेशन, सातारा यांच्याकडून बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील कुरणेश्वर परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक महेश शिवदे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री राजू दीक्षित, डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सनी शिंदे, संपादक विनित जवळकर, भाजपचे (मध्य) शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, भाजप शहराध्यक्षा (बाह्य) वैशाली टंकसाळे, जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस, ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष गोखले, कुरणेश्वर मॉर्निंग ग्रुपचे कार्यवाहक उमेश खंडूझोडे, राजमुद्रा न्यूज चे सचिन सापते, बुलंद सातारा चे पलाश जवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना निलेश तांबे म्हणाले, अयोध्या फाउंडेशनने राबवलेला हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. आताच्या घटकेला पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरणाबाबत जागरुक राहून प्रत्येकाने एक तरी झाड लावून जोपासले पाहिजे. अयोध्या फाउंडेशन चा आदर्श घेऊन इतरही फाउंडेशन, संघटनांनी वृक्षारोपण करावे, असेही आवाहन तांबे यांनी केले.

सचिन म्हेत्रे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने फक्त पर्यावरण दिनाचे औचित्य न साधता वृक्षारोपणाचे बीज अंगीकारले पाहिजे. आपण आज एक वडाचे झाड लावले तर ते पुढील सात पिढ्यांना शुद्ध पर्यावरण युक्त जीवन देऊ शकते हे समजून घेतले पाहिजे. अयोध्या फाउंडेशनच्या या उपक्रमाला पोलिसांचे नेहमीच पाठबळ राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी जयंत देशपांडे, मनीषा पांडे, सुनील काळेकर, उद्योजक धनंजय पाटील, डॉ. सचिन साळुंके, आप्पा कोरे, मनीष महाडवाले, गजेंद्र ढोणे, विक्रम बोराटे, चंदन घोडके, अमोल टंगसाळे, मंगेश गोगावले, रवी आपटे, जोशी, विजय नायक, चित्रा माने, स्मिता जाधव, राणी कांबळे आणि सुवर्णा दुडे यांच्यासह आयोध्या फाउंडेशन सातारा, सातारा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा, कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप, क्षत्रिय ग्रुप, विश्व हिंदू परिषद, हरित सातारा, ऊर्जा फाउंडेशन, भारत विकास परिषद या सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व सौ.ऍड.शुभांगी काटवटे यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी" चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
पुढील बातमी
सातारच्या सुप्रसिद्ध कंदी पेढ्यासाठी जीआय मानांकनाच्या हालचाली

संबंधित बातम्या