फलटण : गेली 25 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी व्यक्तिमत्व असलेल्या आर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी यांना यंदाचा " उषा-वैभव " पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ५ एप्रिल २०२६ या रोजी सायंकाळी 6 वाजता सजाई गार्डन येथे होणार असून सुप्रसिद्ध गायिका श्रीमती उषा मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेज आणि प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी हे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त अनुबंध कला मंडळ , यांनी एक 'Magical RD night' आयोजित केली आहे. सर्वांनी या सोहळ्याला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले आहे. सदरचा कार्यक्रम विनामूल्य आहे, पण त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या मिळण्याचे ठिकाण :- जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण . काव्या ब्युटीक , डी एड चौक , फलटण प्रॉमिस टेलर , डेक्कन चौक , फलटण.