सातारा : एकाची 15 लाखांची फसवणूक प्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोन्याच्या बिस्कीटाचे वेढणे बनवून देतो, असे सांगून 15 लाख रुपये किंमतीचे सोने नेवून ते परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी मुस्तकीन बंगाली (रा. राजब पश्चिम बंगाल) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल् झाला आहे. याप्रकरणी दिनेश दत्तात्रय देशमुख (वय 44, रा. करंजे, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 21 जुलै रोजी घडली आहे. तक्रारदार सोनाराने 15 तोळे वजनाचे सोने संशयिताला दिले आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक ढेरे करीत आहेत.