04:01pm | Dec 23, 2024 |
नवी दिल्ली : कारगिल युद्धाकडे भारतीय सैन्याचा सर्वोच्च पराक्रम म्हणून पाहिलं जातं. हजारो फूट उंचीवर दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी आपली ताकद दाखवून दिली होती. भारतीय सैन्याने सर्वोच्च पराक्रम, शौर्य कारगिल युद्धात दाखवलं. या युद्धाला ‘ऑपरेशन विजय’ नाव देण्यात आलं होतं. ही लढाई अजिबात सोपी नव्हती. कारण आपल्याला खालून वर जायचं होतं आणि पाकिस्तानी सैनिक पूर्ण तयारीनिशी आधीपासून तिथे तैनात होते. त्यांच्याकडून ती ठिकाण मिळवताना भारतीय सैन्याने आपलं शौर्य दाखवलं. या कारगिल युद्धाला 25 वर्ष झाली आहेत. या कारगिल युद्धात एका भारतीय मेंढपाळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्यामुळेच भारतीय सैन्याला सर्वप्रथम पाकिस्तानच्या कारस्थानाचा सुगावा लागला. त्यानंतर एका मोठ्या युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी केंद्रात तत्कालिन अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं.
लडाखी मेंढपाळ ताशी नामग्याल यांनी सर्वप्रथम भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल अलर्ट केलं होतं. त्यानंतर भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन विजय’ची सुरुवात झाली. भारतीय सैन्याला सर्वप्रथम पाकिस्तानी घुसखोरीची माहिती देणाऱ्या ताशी नामग्याल यांचा शनिवारी मृत्यू झाला. लडाखच्या आर्यन व्हॅलीमध्ये त्यांचं निधन झालं. रविवारी ताशी नामग्याल यांना सैन्याने पूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला.
“ताशी नामग्याल यांनी निस्वार्थी भावनेने जे केलं ते नेहमी लक्षात ठेवलं जाईल. त्यांनी देशासाठी जे योगदान दिलं, त्यासाठी भारतीय सैन्य सदैव त्यांचं आभारी राहील. एका देशभक्ताच निधन झालय. लडाखचा वीर-तुमच्या आत्म्याला शांती मिळो. दु:खाच्या या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत” असं ‘फायर एंड फ्यूरी कोर’ ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मे 1999 च्या सुरुवातीला ताशी नामग्याल यांना त्यांची मेंढी सापडत नव्हती. त्या मेंढीचा शोध घेत असताना त्यांना बटालिकच्या पर्वत रांगांमध्ये पाकिस्तानी सैनिक पठानी पोषाखात बंकर खोदताना दिसले. त्यांनी स्थितीच गांभीर्य लक्षात घेत लगेच भारतीय सैन्याला याची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई सुरु झाली.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |