आठ दिवसांत १४ गायींचा विषबाधेमुळे मृत्यू

by Team Satara Today | published on : 08 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात नांदवळ गावात एका शेतकर्‍याच्या १४ गायींचा 8 दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटना घडल्यानंतर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी नुकतीच भेट देऊन पाहणी केली व गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून चाऱ्यामधून गायींच्या शरीरात नायट्रेट गेल्याने मृत्यू झाल्याचे कारण अहवालात स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुकयातील नांदवळ येथील शेतकरी अजिज महमद शेख हे गेली अनेक वर्षांपासून पशुपालन करतात. त्यांचा नांदवळ येथे जनावरांचा गोठा देखील आहे. त्यांच्या गोठयामध्ये एकूण 29 जनावरे होती. दि. 25 जूनपासून अचानक गायींची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांनी तत्काळ खासगी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत गायीवर उपचार सुरू केले.

एकापाठोपाठ एक अशा प्रकारे १४ गायीचा मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजताच पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, पुणे येथील प्रयोगशाळेचे जॉईंट कमिशनर डॉ. हलसुरे, उपायुक्त डॉ. लहाने, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भिसे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर त्यांनी गाईंचा नमुने पुण्याला पाठवून दिले. याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले आहे. 8 दिवसात लहान-मोठ्या १४ गायींचा मृत्यू झाल्याने शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
पोलिसांनी रोखला अल्पवयीनांचा विवाह: पाच जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या