सातारा : सुमारे पावणे दोन लाखांची रोकड चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी 3 ते 3.20 दरम्यान स्वप्निल सतीश गायकवाड (रा. सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्या सदर बाजार, सातारा येथील साई एंटरप्राईजेस दुकानाच्या कॅश काउंटरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 82 हजार 70 रुपये चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.