पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. जरांगे कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण मनोज जरांगे यांना भेटतही आहेत. इच्छुकांचे सुमारे हजार तरी अर्ज जरांगे यांच्याकडे आले आहेत. जरांगे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकही उमेदवारीसाठी येत आहेत. दोन्ही आघाड्यातील या नाराजांना जरांगे पाटील तिकीट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. महायुती आणि मविआमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू? असा सवाल करतानाच विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार आहे. मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचनार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. माझी ती इच्छा नाहीच. तसं असतं तर जाहीर केलं असतं. इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचं आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पहायची होती, पण त्यांनी निवडणुका पुढं ढकलल्या. मग आम्हीपण आमचा निर्णय पुढं ढकलला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत. या दरम्यान समाजासोबत विधानसभेबाबत चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारचं उमेदवार आहेत. निवडणूक लढण्याची इच्छा असणारे राजकीय नेते मला भेटायला येतात. मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10वर्षे कामं करतोय अन् तीन पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको, असं हे नेते सांगत आहेत. एक म्हणतो, हे घराणं नको तर दुसरा म्हणतो, ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असा दावाही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत अन् शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. ते मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत. अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणारच, असा इशारा त्यांनी दिला.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याची सखोल चौकशी व्हावी. फक्त याचं राजकारण करू नका. आरडाओरडा करून तुम्ही आरक्षणाचा विषय मागे पाडण्याचा डाव करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
लाडकी बहीण योजना आणली, ही चांगलीच. पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की. त्याचं काय? हे फक्त नादी लावतात. बरं हे सगळं आमच्या करातून सुरू आहे. कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देतंय, असं ते म्हणाले.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |