सातारा : ओझर्डे, ता. वाई येथे किरकोळ कारणावरुन एकाला खोर्याच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात धनाजी कृष्णराव जाधव (रा. ओझर्डे) यांनी तक्रार असून, राकेश रतन शिंदे आणि महेश रतन शिंदे (दोघेही रा. ओझर्डे) यांच्याविरोधात गुन्हा नोंद आहे. दि. 15 रोजी दुपारी दीडच्या सुमारास प्रकार घडला. तक्रादार धनाजी जाधव हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी संशयितांनी अडवून मघाशी ट्रॅक्टर का जाऊ दिलास, अडवला का नाही, म्हणून शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच चिडून दुचाकीला अडकवलेले खोरे काढून लोखंडी पाईपच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये जाधव हे जमखी झाले आहेत.