03:08pm | Dec 03, 2024 |
सातारा : शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर तर्फे आयोजित २०२४” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राऊंन्ड,सातारा येथे दिनांक २६, २७, २८, २९ डिसेंबर, २०२४ यावेळी (सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत) आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश विनामुल्य असेल. “रचना २०२४” चे मुख्य प्रायोजकत्व हे 'Classic Group A Venture by Sumit Bagade' तसेच ‘Scon Infra Prestress LLP' यांनी स्विकारलेले आहे. तसेच या भव्यदिव्य अशा प्रदर्शनाचे सहप्रायोजक हे ‘कंग्राळकर असोसिएटस्', 'स्टेट बँक ऑफ इंडिया', 'कालिका स्टिल', ‘परफेक्ट हाऊस प्रा.लि.' यांनी स्विकारलेले आहे अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना असोसिएशनचे सेक्रेटरी हर्षद वालावलकर यांनी सांगितले की, आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअलईस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे ३४वे वर्ष साजरे करत आहे. येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागांमध्ये रिअलईस्टेटसाठी बांधकाम व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल असे जाणकारांचे मत आहे. सातारा व आजूबाजूच्या भागांमध्ये चालू असेलेले व नियोजित असलेले महत्वकांक्षी शासकिय प्रकल्प यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या उज्वल भविष्यकाळासाठी गुंतवणूकीकरीता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना पर्वणीच ठरणार आहे.
“रचना २०२४" हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी-विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझाईन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव- नवीन तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डन्स याकरीता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे. नवीन सरकारी धोरणांनुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीतकमी व्याजदराने खरेदीदारांना पुरविले जाणार आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहेत.
“रचना २०२४” या वास्तू प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभाग घेणार आहेत. त्यामुळे घर घ्यावयाची हिच योग्य वेळ आहे. रचना २०२४” या प्रदर्शनामध्ये सुमारे १०० स्टॉलस् उभारले जाणार असून, बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंन्टस्, इलेक्ट्रिकल ॲसेसरीज्, इनोव्हेटीव्ह बिल्डींग मटेरिअलस्, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस इक्विपमेंन्टस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल.
रचना २०२४" हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत. सातारा जिल्हा परिषद ग्राऊंड येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रांतून ४ दिवसात ३ लाखांपेक्षा जास्त लोकं याठिकाणी येऊन सदर प्रदर्शनास भेट देत असतात व यापुढेही देतील. असा आयोजक समितीचा अंदाज असून, करोडो रूपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ना नफा ना तोटा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटर तर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जात असते. सर्व सभासद प्रसंगी स्वत:ची कामे बाजुला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायास ऊर्जीतावस्था येण्याकरीता व खरेदीदारांना आपल्या पैशांचा पुरेपुर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात.
" रचना २०२४” मध्ये स्टॉल्स बुकिंगसाठी संपर्क निलेश पाटील मोबाईल नंबर ८६००४३३९०९ व मंगेश लावंड मोबईल नंबर ९८२३८८७७७६ यांचेशी संपर्क करावा असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करण्यात आले आहे.
यावेळी माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, असोसिएशनचे उपाध्यक्ष सयाजी भोसले, ट्रेझरर पृथ्वीराज पाटिल, कौन्सिल मेंम्बर सुधीर घार्गे, अनिल दातीर यांनी रचना प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |