सरपंच महिलेला मारहाण

by Team Satara Today | published on : 19 February 2025


सातारा : रस्ता केल्याच्या रागातून सरपंच महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अन्य महिलेविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी बेंडवाडी पो.आसनगाव ता.साताराच्या सरपंच वैशाली विजयसिंह गावडे (वय 40, सध्या रा.शाहूनगर) यांनी तक्रार दिली आहे. शोभा शंकर खोत (रा. शाहूनगर, सातारा) यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना दि. 17 फेब्रुवारी रोजी शाहूनगर येथे घडली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परताव्याच्या आमिषाने सुमारे 11 कोटींची फसवणूक
पुढील बातमी
वहिनीचा विनयभंग; दीरासह तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या