शहीद अंबादास पवारांची पत्नी झाल्या थेट डीवायएसपी

by Team Satara Today | published on : 23 April 2025


सातारा : कवठे, ता. वाई येथील असलेले व मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अंबादास पवार यांच्या पत्नीला राज्य सरकारने थेट पोलिस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) नियुक्ती दिली आहे. तब्बल 17 वर्षानंतर पवार कुटुंबियांना शासनाची मदत मिळाली आहे.

मुंबईवर 26/11 हा भ्याड हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचारीही धारातीर्थी पडले. जावलीचे सुपुत्र तुकाराम ओंबाळे यांनी अजमल कसाब याला जिवंत पकडले. मात्र, ओंबाळे यामध्ये शहीद झाले. ओंबाळे यांच्याप्रमाणेच सातारा जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र मुंबई पोलिस अंबादास पवार यांनीही दहशतवादी हल्लेखोरांशी दोन हात केले. यामध्ये मुंबई पोलिस अंबादास पवार हे शहीद झाले.

शहीद अंबादास पवार हे मूळचे कवठे ता. वाई येथील आहेत. प्राथमिक शिक्षण गावातच झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण किसनवीर कॉलेज वाई येथे झाले. मुंबई पोलिस झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. अंबादास पवार यांची आई व दोन भाऊ व त्यांचे कुटुंबिय कवठे येथेच वास्तव्य करत आहेत. अंबादास पवार यांची पत्नी व मुलगा हे मुंबई येथेच आहेत. अंबादास पवार हे 26/11 मध्ये शहीद झाल्यानंतर कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी त्यांची पत्नी कल्पना पवार या प्रयत्न करत होत्या. 17 वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट डीवायएसपी पदाची नियुक्ती दिली. यामुळे कवठे ग्रामस्थांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नायगाव येथील सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख मंजुर
पुढील बातमी
इंजेक्शनमुळे जळगावात दोन बालकांचा मृत्यू

संबंधित बातम्या