कागदपत्रे गहाळ करणार्‍या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 January 2025


सातारा : उंब्रज पोलीस ठाण्यात 25 मे 2016 पासून कर्तव्यास असलेले व सध्या सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर कृष्णाजी आवळे यांच्याविरोधात आरोपीस सहकार्य करण्यासाठी कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहायक निरीक्षक रवींद्र भोरे यांनी फिर्याद दिली. उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास आवळे यांच्याकडे होता. 167/2015 या गुनह्याचा तपास करून ही कागदपत्रे न्यायालयात दाखल करणे अनिवार्य असताना देखील आवळे यांनी ही कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यांना समक्ष तोंडी सूचना देऊन कागदपत्रे हजर करण्यास सांगितले असताना त्यांनी ते टाळून आदेशाचे पालन केले नाही. फिर्यादीला न्याय देण्याचे कर्तव्य असताना त्यांनी आरोपीला सहकार्य व्हावे म्हणून मूळ कागदपत्रे गहाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी सात जणांवर कारवाई
पुढील बातमी
ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

संबंधित बातम्या