सातारा : येथील त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक भ्रातृभाव जपणाऱ्या धम्म चळवळीच्यावतीने संविधान दिवस गोडोलीच्या जेतवन बुद्धविहारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित धम्ममित्र व धम्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि रक्षणासाठी सर्वजण कटिबद्ध होऊयात. अशी प्रतिज्ञा घेतली. भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान जनजागृती व संविधान सन्मान कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे यावेळी धम्मचारी संघादित्य यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर बुद्धिमत्ता, त्यागामुळे व कष्टामुळेच या देशाला संविधान मिळाले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुःसूत्रीने देशातील सर्व नागरिकांना एका धाग्यात बांधले.
संविधानाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना धम्ममित्र विकास लादे, अरुणा मस्के व प्रवीण धस्के यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन धम्ममित्र मिलिंद कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार धम्मचारी संघादित्य यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्येने धम्ममित्र बंधू भगिनी उपस्थित होत्या.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |