व्हिडीओ शुटिंग केल्याच्या रागातून होमगार्डला मारहाण; १६ जणांना अटक

by Team Satara Today | published on : 14 April 2025


सातारा : दरे तर्फे परळी, ता. सातारा येथील यात्रेत वादावादी सुरू असताना त्याचे व्हिडीओ शुटिंग केल्याच्या रागातून होमगार्डला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी १६ जणांना अटक केली. ही घटना दि. १२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरे तर्फ परळी गावची दि. १२ रोजी यात्रा होती. यावेळी जुन्या वादातून यात्रा कमिटी ग्रामस्थ व सुधीर जाधव यांच्यात वादावादी सुरू झाली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेले होमगार्ड श्रीधर भोईटे (वय २८) यांनी वाद पाहून त्यांचे व्हिडीओ काढले. या कारणावरून नितीन अडागळे, मोहन तानाजी जाधव, वाल्मिक गोडसे, नवनाथ जयसिंग जाधव, चंद्रकांत हणमंत पवार, सूर्यकांत धोंडीराम तुपे, संतोष गुलाबराव जाधव व दोन महिलांसह  १५ ते २० जणांनी होमगार्ड श्रीधर भोईटे यांना मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर व्हिडीओ डिलीट केले. तेथे असणाऱ्या छपरामध्ये उभे करून अडवून ठेवले. या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन यातील १६ जणांना अटक केली. न्यायालयाने संबंधितांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
सामाजिक न्याय भवन येथे संविधान स्तंभाचे अनावरण

संबंधित बातम्या