पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. उमेदवारांनी व बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी सुद्धा झालेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी व नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहेत. सर उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी कुर्ल्यातील नेहरुनगर मतदारसंघामधील मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळेस बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला अटक होऊ शकते असं म्हटलं. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
“इतक्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित आहेत, एवढे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्याचा डिपॉझिट जप्त होणार. सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल ना? की डाऊट आहे? कारण मंगेश कुडाळकर मागच्या वेळी 24 हजार मतांनी निवडून आले. आता तुम्हाला त्यांना 50 हजार मतांनी जिंकवायचं आहे. मंगेश कुडाळकर यांचा विजय पक्का आहे. त्यांचं मी आधीच अभिनंदन करतोय. फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. काही ठिकाणी लवंगी फटाके आहेत. पण आपला 23 तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “म्हणूनच मी एका विश्वासाने तुमच्या मतदारसंघात सुरुवात केलेली आहे”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले, “आता दर महिन्याला ओवाळणी मिळणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार विरोधकांनी सांगितलं आहे. रामदास आठवले आपल्या सोबत आहेत. भाजपा आपल्या सोबत आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे.. तुम्हाला आता फक्त वर्षाला भाऊबीज नाही मिळणार तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार. ज्यांच्या खात्यात पैसे नाही जमा झाले त्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार हा निरोप द्यायला आलो आहे. विरोधक म्हणतात की ही योजना बंद होईल. महिलांना विकत घेतात त्यांचा स्वाभिमान विकत घेतात असं विरोधक म्हणतात त्यांना तुम्ही काय म्हणाल? या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांना तुम्ही चपलेचे जोडे दाखवणार की नाही?” असा सवाल उपस्थित महिलांना विचारला.
“फक्त लाडक्या बहिणींना नाही तर आम्ही ही योजना अजून वाढवणार आहोत. आता निवडणुकीचे आचारसंहिता लागली आणि विरोधकांना वाटलं की आता नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत. आम्हाला माहीत होतं की विरोधी पक्ष चालाख आहे. पण आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिलेत. त्यामुळे विरोधकांचे तोंड बंद झालं. आता 20 तारखेला जसे निवडणुका संपतात तसे आम्ही डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला देणार आहोत. फक्त पंधराशे आणि दोन हजार असे रुपये आम्ही नाही देणार तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही तर बहिणींना लखपती बनवणार आहोत. ऍडव्हान्स देणारे हे सरकार आहे. आधीचे सरकार ॲडव्हान्स घेणारे होते आम्ही देणारे आहोत. पाच हप्ते तुमच्या खात्यात आले. मागचे सरकार हप्ते वसूल करणारे सरकार होते. त्यांची घेना बँक आहे आमची देना बँक आहे,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात गेले होते पण कोर्टाने चपराक लगावली. ते लोक असं म्हणत असतील की लाडक्या बहिणीला ज्यांनी पैसे दिले ते गुन्हेगार आहेत तर असे गुन्हे करायला मी एकदा नाही तर दहा वेळा गुन्हे करायला तयार आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. “लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडीचे लोक नागपूरमध्ये कोर्टात गेले. आता ते म्हणतात की, आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजना बंद करु. या योजनांची चौकशी केली जाईल असं ते म्हणत आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना तुरुंगात टाकू असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्या या लाडक्या भावालाही तुरुंगात टाकतील. हे चालेल का तुम्हाला? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित महिलांना विचारला.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |