अनुजच्या मृत्यूला जबाबदार कोण? न्यायासाठी आई-वडिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार

निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी; आमरण उपोषणाने प्रशासनासमोर आव्हान

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : नऊ वर्षांच्या अनुज भिसेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटकांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत, संबंधित कामाची सखोल चौकशी करावी, ठेकेदारासह जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि अनुजच्या मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.
न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा आई-वडिलांनी घेतला आहे. प्रसंगी जीव गेला तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आपल्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी पालकांनी पुकारलेल्या या लढ्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.एका कुटुंबाच्या दुःखाचे न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात रूपांतर झाले असून, आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी आणि कारवाईबाबत काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर वाहतूक शाखेचा कारवायांचा धडाका सुरुच; नियमभंग करणार्‍या मॉडिफाय बुलेटवर धडक कारवाई
पुढील बातमी
वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 32 लाख 60 हजारांची फसवणूक; चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या