बेळगाव : मच्छेतील बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून पाच लाखांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, श्रीधन बाळेकुंद्री व वाचनालयाचे माजी अध्यक्ष संतोष जैनोजी यांनी पाठपुरावा केला.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा निधी मंजूर केला आहे. यानिमित्त वाचनालयाच्या पदाधिकार्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्र शासन सीमाभागातील भागामध्ये मराठी भाषा विकास व संवर्धन करणार्या संस्थांना आर्थिक मदत करत आहे. या उपक्रमाची माहिती शेतकरी नेते राजू मरवे यांनी पदाधिकार्यांना दिली. यानंतर प्रस्ताव पाठवला होता.
वाचनालय वाचन चळवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चर्चासत्रे, व्याख्याने, मराठी भाषा कला साहित्य संस्कृती कार्यक्रम असे वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे, ही मदत मिळाली आहे. मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी वासुदेव लाड, संतोष जैनोजी, बजरंग धामणेकर, गजानन छप्रे, अध्यक्ष संभाजी कणबरकर, उपाध्यक्ष सुर्यकांत मरूचे, खजिनदार सुशील धामणेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.