बुधवार पेठेत चैन स्नॅचिंग

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा : सातारा शहरातील बुधवार पेठेत अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार पेठेत घराचे अंगण लोटत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी वृध्दाची गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी गोविंद सदाशिव मांढरे (रा. बुधवार पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दि. 6 मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तक्रारदार हे घरासमोरील अंगण लोटत होते. त्यावेळी एका दुचाकीवरुन दोन अनोळखी तरुण आले. त्यातील एकाने मांढरे यांच्या गळ्यातील वाघनख्याचे पेंडल असलेली सोन्याची चेन हिसकावली. या चेनचे वजन अडीच तोळे होते. त्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरुन पलायन केले. या सोन्याच्या चेनची किंमत सुमारे एक लाख रुपयाहून अधिक आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर परिसरातून तीन दुचाकींची चोरी
पुढील बातमी
ट्रक-टँकर अपघातात एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या