सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 मार्च रोजी 7 वाजण्याच्या सुमारास बाळासो गुलाबराव कणसे रा. अंगापूर वंदन, ता. सातारा हे राहत्या घरातून आबापुरी येथे देवाला जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.