दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

by Team Satara Today | published on : 18 October 2025


सातारा : सातारा तालुक्यातील संजय गांधी व आवणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना कळविणेत येते की, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थ सहायय रुपये एक हजार पाचशे रुपये वरुन देान हजार पाचशे रुपये इतके करण्यात आलेले आहे.

तरी ज्या दिव्यांग लाभार्थी यांना माहे ऑक्टोबर 2025 मध्ये रक्कम रु देान हजार पाचशे ऐवजी रक्कम रु एक हजार पाचशे पेन्शन जमा झालेली आहे अशा दिव्यांग लाभार्थीनी त्यांचे अदयावत UDID कार्ड, आधार कार्ड व बैंक पासबुक ची छायाप्रत तहसिल कार्यालय सातारा येथे जमा करावी. ज्या दिव्यांग लाआधी यांचे UDID कार्ड जमा केलेनाही त्यांनी त्यांचे UDID कार्ड हे जिल्हा शासकिय रुग्णालय येथून प्राप्त करुन घ्यावे. सदर  कार्ड नसल्यास दिव्यांग लाभार्थी यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कार केअर वर्कशॉपला भीषण आग
पुढील बातमी
दुचाकीस्वारांनी मुलाच्या पायावर टाकला फटाकडा

संबंधित बातम्या