सातारा : सातारा तालुक्यातील गोवे येथील जयराम किसन बागल(वय ५५) यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेची खबर ओंकार जयराम बागल (वय २६) यांनी तालुका पोलिसांना दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत आहे.