सातारा : येथील श्री पंचपाळी हाऊद दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी दुर्गा माता याग सोहळ्याची सांगता रविवारी संपन्न झाली या यागाच्या महाप्रसाद सोहळ्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून सातारकर भक्तांनी मंदिर परिसरात आयोजित केलेल्या भोजन मंडपात महाप्रसाद घेऊन या या सोहळ्याची सांगता केली.
अतिशय सुरेख आणि नेटके पणाने आयोजित केलेल्या या सहस्त्रचंडी याग सोहळ्याची सांगता झाल्यानंतर गेले आठ दिवस सुरू असलेल्या या धार्मिक तसेच मार्गदर्शनपर उपक्रमाची सांगता झाल्याने अनेक भक्तांना खरोखरच रूखरूख लागून गेली होती. केवळ एक दिवसाचा अवधी मध्ये ठेवून मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने आज मंदिर परिसरात या महाप्रसाद सोहळ्याची विशेष व्यवस्था केलेली होती . दुपारी बारा वाजता दुर्गा मातेची महाआरती तसेच विशेष जागरण गोंधळ संपन्न झाल्यावर महाप्रसादाच्या पंक्ती घालण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र महिला स्वयंसेवक तसेच पुरुष स्वयंसेवक झटत आहेत .एक अनोख्या पद्धतीने हा असा अवर्णनीय सोहळा संपन्न केल्याबद्दल शेकडो सातारकरांनी मंदिर ट्रस्टचे विशेष आभार मानले. तसेच गेली 50 वर्षात असा महायज्ञ सोहळा पाहण्यातही आला नव्हता ,त्याचे संयोजन करून एक वेगळ्या पद्धतीने आदर्श आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा हा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र ठरणारा असल्याचे अनेक सातारकरांनी याप्रसंगी सांगितले .
महाप्रसादासाठी विशेष टेबल खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात आयोजित केलेल्या या महाप्रसाद सोहळ्यासाठी तुषार जोशी, श्रीपाद जाधव यांचे सह अनेक भक्तांनी सढळ हस्ते मोठ्या प्रमाणात रोख तसेच वस्तू रुपात मदतीचा हात पुढे केल्यामुळे हा महाप्रसाद सोहळा यशस्वीपणे पार पडल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली .
मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महाशिबिर , रक्तदान महाशिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आरोग्य महाशिबिर आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले .कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत.
सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच यासाठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.