सातारा : मायलेकाला मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धनंजय देवकांत कदम आणि त्यांची आई शोभा देवकांत कदम रा. लिंब, ता. सातारा यांना पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच लखन किसन लोहार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.