सातारा : वाढे (ता. जि. सातारा) येथील इंडस मोबाईल टॉवरमधून वी नेटवर्कची सहा लाईन कार्ड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 12 हजार रुपये किमतीच्या या कार्ड चोरीप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इंडस मोबाईल टॉवर येथे 8 ऑगस्ट रोजी पहाटे 1.40च्या सुमारास चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित कंपनीची परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीने टॉवरमधील सहा लाईन कार्ड काढून नेल्याचा आरोप आहे.
याबाबत मनोज शंकर शहापुरे (वय 44) यांनी 22 ऑगस्ट रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीस गेलेल्या कार्डांची किंमत सुमारे 12 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.