08:45pm | Nov 29, 2024 |
खंडाळा : खंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे हीचा असल्याचे समजल्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करणेत आला आहे. तद्नंतर 12 तासांच्या आतच सदर खुनाचा गुन्हा उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथे सोमवारी, दि. 25 रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.जयश्री विनय मोरे (27, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून दिनेश पोपट ठोंबरे (32, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मयत जयश्री मोरे पतीपासून विभक्त राहत होती.दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायजर असून त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर ऍक्टिव असायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लिव्ह इन रिलेशन मध्ये असताना त्यांना तीन वर्षांचा मुलगा असल्याचे समजते. जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगळे राहायचे म्हणत होती. रविवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात निर्जन ठिकाणी जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परतला. सोमवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी बनाव करण्याच्या हेतूने दिनेश ठोंबरे याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.
खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने पटली मृतदेहाची ओळख
खंडाळा घाटामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवाशाने पोलीस कंट्रोल ला 112 नंबरला कॉल करून सांगितले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यु टीम च्या साह्याने मृतदेह वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशान्वये पोलीस उप अधीक्षक राहुल धस, स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, स.पो. नि.संतोष म्हस्के, पो. ह.संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळते जुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असलेबाबत माहिती मिळाली. दरम्यान, जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीसांनी वाकड येथे जात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या साह्याने वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश ठोंबरेच असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीच्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिलेचे निदर्शनास आले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता. खंडाळा पोलिसांच्या सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 12 तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली.
...तर जनता माफ करणार नाही : विलासबाबा जवळ |
सुनील वाघमळे यांना बालगंधर्व स्मृती पुरस्कार |
तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती! |
किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री शंभूराजे यांनी केली पाहणी |
अजिंक्यतारा कारखान्याचा पहिला हप्ता ३२०० रुपये जाहीर |
समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे |
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे |
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |