सातारा : गत सात वर्षापासून मुक्ता साळवे साहित्य परिषद महाराष्ट्राच्यावतीने महाराष्ट्रामध्ये प्रतिवर्षी मुक्ता साळवे साहित्य व संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी सातारा येथे सातवे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी होणार असल्याची माहिती संस्थापक सचिन बगाडे यांनी दिली.
या संमेलनाचे अध्यक्षपदी लेखक, संशोधक व्याख्याते प्रा. डॉ. शरद गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. प्रबोधनाच्या चळवळीत उपेक्षित वंचित समुहाचे इतिहासातील योगदान संशोधित करुन समोर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत. आजपर्यंत शेकडो व्याख्याने, पुस्तके, लेख लिहून चळवळीत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
संमेलनाचे उद्घाटक म्हणून अनुराधा भोसले असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने असणार आहेत. तर उमेश खंडुझोडे संयोजन समितीचे प्रमुख आहेत. निमंत्रक म्हणून माधवराव साठे, पोपटराव आवळे, विजय मोरे, नंदा भिसे, शंकर कवळे, ॲड. संतोष कमाने असणार आहे. या पत्रकार परिषदेस उमेश खंडुझोडे, नंदा भिसे उपस्थित होते.