बांदीपोरा : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (4 जानेवारी, 2025) भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळण्याची घटना घडली. या अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.सैनिकांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील कूट पायीन भागाजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेतील जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. या अपघातात दहशतवादी कोन असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.
याआधीही 24 डिसेंबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ता अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात पाच जवान शहीद झाले.बरोबर चार दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला, जेव्हा अनेक जवानांना घेऊन लष्कराचे वाहन ऑपरेशनल ड्युटीवर जात होते. वाटेत अपघात झाला आणि लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले. या अपघातातही पाच जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी राजौरी जिल्ह्यात वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.तर दुसरा जवान जखमी झाला होता. 2 नोव्हेंबर 2024 रोजी, रियासी जिल्ह्यात एक कार डोंगराच्या रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. आता शनिवारी बांदीपोरा येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने दोन जवांना वीरमरण आले आहे, तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |