सातारा : दुर्गा पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 14 दरम्यान एजाज इसाक शेख रा. दुर्गा पेठ, सातारा यांची गॅरेज समोरील रस्त्यावर पार्क केलेली यामाहा कंपनीची दुचाकी क्र. एमजेजी 0801 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.