पाचवड ते वाई मार्गावर कुंभारवाडी गावच्या हद्दीत गॅसच्या ट्रकचा अपघात; ट्रक व टाटा टेम्पोची धडक, दोन्ही चालक जखमी

by Team Satara Today | published on : 07 October 2026


पाचवड : पाचवड ते वाई मार्गावर कुंभारवाडी (ता. वाई) गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भारत गॅसचा ट्रक व टाटा टेम्पोची धडक होऊन दोन्ही चालक जखमी झाले. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्‍यात नोंद करण्‍याचे काम सुरू होते. चंद्रकांत कांबळे (वय ५८, रा. वाई) व अशोक वसंतराव मोहिते (वय ५२, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी जखमी चालकांची नावे आहेत.
भारत गॅसची गाडी (एम.एच ११ एएल ३८८३) वाईकडून येत होती, तर टेम्पो (एम.एच ११ डीए ६६३१) पाचवडकडून वाईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वाहनांचे नुकसान झाले. ज्‍या वाहनात गॅस होते त्‍या वाहनाला आग लागली नाही, अन्‍यथा मोठी दुर्घटना घडली असती.
गॅस गाडीतील भरलेल्या गॅस टाक्यांमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित विभागाला पाचारण केले. त्यानंतर गॅसच्या टाक्या दुसऱ्या गाडीत सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आल्या. टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालक अशोक मोहिते यांना सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी तोडरमल व कुंभार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने केबिन सरळ करून बाहेर काढले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकांच्या प्रेमामुळेच जिल्हा बँकेत मी बिनविरोध : खा. उदयनराजे भोसले, नावरूपाला आलेल्या बँकेत कुठल्याही प्रकारचे राजकारण आणू नये
पुढील बातमी
घटनात्मक अपराध करणाऱ्यांना पक्षचिन्हाचा लाभ मिळणार की त्या अपराधाची तक्रार करणाऱ्यांना?' न्यायमूर्ती जॉयमाल्या बाग यांनी उपस्थित केला सवाल

संबंधित बातम्या