मुंबई : भारतीय सलामीवीर शिखर धवनने आज आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर 'गब्बर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखरने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. धवनने डिसेंबर २०२२ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी खेळला होता, त्यानंतर तो सतत संघाबाहेर होता. त्याने निवृत्ती घेतली असली तरी, तो २०२५मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने व्हिडिओत आयपीएलमधून निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही.
शिखर धवनने १ मिनिट १७ सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
धवन व्हिडिओमध्ये म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार! आज मी अशा वळणावर उभा आहे जिथून मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसतं. टीम इंडिया खेळण्यासाठी माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्व प्रथम माझे कुटुंब... माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी... मदन शर्मा जी ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो.
शिखर पुढे म्हणाला, 'भारतीय क्रिकेट संघ रूपी मला एक परिवार मिळाला, ज्यांच्या सोबत मी वर्षानुवर्ष खेळलो. मला नाव मिळाले आणि मला तुम्हा सर्वांचे प्रेम मिळाले. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जाण्यासाठी पाने उलटणे आवश्यक आहे, म्हणून मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे.
धवन व्हिडिओच्या शेवटी म्हणाला, 'जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत आहे, तेव्हा माझ्या मनात एक शांतता आहे की मी माझ्या देशासाठी खूप खेळलो आणि मला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय-डीडीसीएचा खूप आभारी आहे. संधी दीया आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांचा मी ऋणी आहे.
मिस्टर आयसीसी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले. ज्यात त्याने अनुक्रमे २३१५, ६७९३ आणि १७५९ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २४ शतके आहेत. धवनने वनडेमध्ये १७ आणि कसोटीत ७ शतके झळकावली आहेत. भारतासाठी टी-२० मध्ये त्याच्या नावावर एकही शतक नाही. त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने इंग्लंडला पराभूत करून भारत चॅम्पियन बनला तेव्हा तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |