सातारा : शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ परिसरात घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी 42 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी आरती शिबीराज राजपूत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घराच्या बंद दरवाजाची कडी आणि हुक काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. घरात प्रवेश केलेल्या तिघांपैकी एकाने मंगळसूत्र चोरल्याचे आरती राजपूत यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मदने करत आहेत.
शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ परिसरात घरफोडी; 42 हजारांचे मंगळसूत्र चोरीला
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा