अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

सातारा : राज्यातीक सहकार क्षेत्रातील अग्रणी सहकारी साखर कारखाना असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२३-२४ करीता वसंतदादा शुगर इनिस्टटयूट, पुणे यांचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार" (BEST TECHNICAL EFFICIENCY AWARD) जाहिर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा गुरूवार दि.२३ रोजी होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या खंबीर नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कारखान्याने सर्व बाजूने विकासात्मक उभारी घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काटकसरीचे धोरण व मुल्यवर्धित उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून, अनंत अडचणीवर मात करून आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या या कारखान्याचे कामकाज जिल्हयातच नव्हे तर राज्यात सुध्दा उल्लेखनिय व आदर्शवत आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ करीता वसंतदादा शुगर इनिस्टटयूट, पुणे यांचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार झाला असून पुरस्कार वितरण सोहळा गुरूवार दि.२३.०१.२०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कारखान्याने आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराजसाहेब) म्हणाले की, या पुरस्काराने अजिंक्यतारा कारखान्याच्या  नावलौकिकात भर पडली असून, अजिंक्यतारा कारखान्याची मान आणखी उंचावली आहे. यावेळी  कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे, व्हाईस चेअरमन.नामदेव विष्णू सावंत, सर्व मा.संचालक व कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

मागील बातमी
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी
पुढील बातमी
मराठी माणसांना मुंबईतुन विस्थापित करणारे दलाल कोण ?

संबंधित बातम्या