सातारा : गोडोलीत अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 16 दरम्यान प्रणव प्रमोद जाधव रा. वेचले, ता. सातारा यांच्या गोडोली, सातारा येथील ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून 36 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.