दिवाळीचा फराळ देशात, परदेशात पाठवा; भारतीय डाक विभागामार्फत सातारा सॉर्टिंग ऑफिस, पोवई नाका येथे २४ तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : दिवाळी हा आनंदाचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांना घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि नेहाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सातारा सॉर्टिंग पोस्ट ऑफिस, पोवई नाका, सातारा येथे २४ तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार पार्सल बुकिंग करता येणार आहे. देशाच्या विविध भागांत तसेच परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना, मित्रांना आणि आप्तस्वकीयांना दिवाळीचा फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे
महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये घरगुती दिवाळी फराळ, भेटवस्तू आणि इतर पात्र वस्तू पाठविण्यासाठी ग्राहक भारतीय डाक विभागाच्या देशांतर्गत पार्सल सेवांचा लाभ घेऊ शकतात. परदेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे संबंधित देशाचे आयात नियम, खाद्यपदार्थ पाठविण्यावरील निर्बंध आणि भारतीय डाक विभागाच्या अटी यांची माहिती घेऊनच फराळाचे पार्सल बुक करावे.
दिवाळीच्या काळात पार्सल पाठविण्यासाठी होणारी गर्दी आणि वेळेची अडचण लक्षात घेता, सातारा सॉर्टिंग पोस्ट ऑफिसमधील २४ तास बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. व्यापारी, व्यावसायीक, गृहउद्योग चालक, महिला बचत गट आणि फराळ उत्पादकांनीदेखील आपल्या उत्पादनांची देशभरात तसेच परदेशात पाठवणी करण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा ,असे आवाहन श्री. गुरुदास मोंडे अधीक्षक, रेल मेल सेवा यांनी केले आहे.
0000


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निकृष्ट चारा सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया उपयुक्त; पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचा पर्याय; उपलब्ध कुटारातून पौष्टिक चारा तयार करण्याचे आवाहन
पुढील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन

संबंधित बातम्या