गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी जिल्ह्यात 14 वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण; मुलींना लसीकरण करुन घ्यावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 06 March 2026


सातारा : महिलांमध्ये झपाटयाने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर आळा घालन्यासाठी केंद्र शासनाने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरातील 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एच पी व्ही) लसिकरण मोहिम लवकरच राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गार्डासिल ही लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच ह्या लसीची मात्र फक्त एक डोसच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,आरोग्य  मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री श्रीम मेघना साकोरे बोर्डीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली दि 8 मार्च 2026 रोजी, महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात शुभारंभ करण्यात येणार आहे.

मोहिमेच्या अनुषगांने एच पी व्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पुर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पुर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येईल. मोहिम सुरु झाल्या नंतर पुढील 90 दिवसांच्या कालवधीत 15 वर्षे पुर्ण होणा-या मुली देखील या तीन महिन्यांच्या एच पी व्ही लसिकरण मोहिमेस पात्र राहतील. एकूण लोसंख्येच्या 1 % लाभार्थी हे मोहिमेकरीता अपेक्षीत लाभार्थी असतील. या मोहिमेत विशेषता आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील कुटुंबाना दिलासा मिळणार आहे.

या मोहिमे करीता लाभार्थी यु-विनवर (U-WIN) स्वत:ची नोंदणी करु शमतात  किंवा आरोग्य कर्मचा-याच्या मदतीने पूर्व नोंदणी करुन एच पी व्ही लसिकरणासाठी अपॉइाटमेंट घेऊ शकतात किंवा थेट येऊन (Walk-in) डिजिटल यु-विन प्लॅटफॉर्मचा वापर करुन जागीच नोंदणी देखील करु शक्तात. लाभार्थींची नोंदणी, अहवाल व प्रमापत्र देणे ही प्रक्रिया U-Win डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात येणार आहे. 

एच पी व्ही लसिकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि मुलींच्या लसिकरणापूर्वी पालकांची संमती घेणे अनिवार्य आहे. U-WIN पोर्टलवर डिजिटल संमती घेता येईल. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास निर्धारित नमुन्यात हार्ड कॉपीवर संमती घेण्यात येणार आहे. ही लस शासकिय रुग्णालय जसे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मोफत उपलब्ध देणेत येणार आहे.

केंद्र व राज्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनां नुसार महाराष्ट्र राज्यात एच पी व्ही लसिकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मध्ये 14 वर्षीय मुलींना ही लस शासकिय रुग्णालयामध्ये मोफत देणेत येणार आहे. तरी सर्व पात्र लार्थीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. 

एच पी व्ही लसिकरण हे गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षित उपाय आहे. किशोर वयात लस घेतल्यास भविष्यात या कर्करोगाचा धोका लक्ष्णीयरीत्य कमी करता येतो. तरी 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींना हे लसिकरण करुन घ्यावे. श्री संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक, प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत हैदराबाद अभ्यास दौरा
पुढील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन; मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे आश्वासन

संबंधित बातम्या