सातारा : संशयास्पद वस्तू जवळ बाळगून फिरणार्या पाचजणांवर संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोळाचा ओढा रस्त्यालगत हेक्सा ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर घेवून संशयास्पदरीत्या फिरणार्या दोघांना पकडून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मंगेश राजेंद्र चव्हाण (वय 25), प्रतीक रामचंद्र पवार (वय 20, दोघे रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दि. 29 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसर्या घटनेत मोळाचा ओढा ते शाहूपुरी पोलीस ठाणे रोडवर संशयास्पदरीत्या फिरणार्या तीन युवकांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 24), क्षितीज संतोष पवार (वय 20), रोहन सतीश पवार (वय 21, सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली आहे.