सातारा : रविवार पेठेत गुरवे ग्लाससमोर लावलेली स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.
याबाबतची फिर्याद सुरज हनुमंत नागराळे (वय २६ रा.रविवार पेठ, मूळ रा. जत, ता. जि.सांगली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि १४ रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करत आहेत.