बालकामगार ठेवणारी कंपनी बंद करा : गायकवाड

15 ऑगस्टला अनोखे आंदोलन करण्याचा इशारा

by Team Satara Today | published on : 12 August 2024


सातारा : खंडाळा तालुक्यातील हायटेक प्लास्टिक प्रा. लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात बालकामगार मजूर काम करत आहेत. संबधित ठेकेदार हा या मजुरांचे शोषण करत असून संबंधित कंपनी तात्काळ बंद करावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे, तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, अजय घाडगे, अक्षय शिंदे उपस्थित होते. अशोक गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्यात असणार्‍या सर्रास एमआयडीसीत बालकामगार आहेत. त्यात खंडाळ्यात हायटेक प्लास्टिक प्रा. लिमिटेड कंपनीत बालकामगार जास्त आहेत. या कामगारांचे वय 15-18 वर्षे इतके असून या कंपनीत प्लास्टिक बाटल्या तयार केल्या जात आहेत. लहान मुले कामाला ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून याबाबत वारंवार तक्रार केली असूनही दखल घेतली जात नाही. त्याविरोधात आंदोलनाचा लढा सुरू करणार असताना पोलिस यंत्रणेकडून दबाव आणला गेला.
गेले चार दिवसापासून कंपनीच्या तेथे उपोषण सुरू आहे. ठेकेदार कामगारांना 12 तास काम करून घेत त्यांचे शोषण करत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी दिलेल्या घटनेनुसार कामगारांना फक्त 8 तास काम असावे. प्रशासनाने तात्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखून ही कंपनी बंद करावी, अन्यथा दि. 15 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पुन्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा सातार्‍यात पाणी कपात लागू

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी