10:18pm | Nov 09, 2024 |
विधानसभा निवडणुकीसाठी सचिन मोहिते यांची उमेदवारी नाकारली गेल्याने त्यांची नाराजी कायम होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा आहे. सचिन मोहिते यांनी गेल्या चार वर्षांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोविड काळामध्ये रुग्णांना मदत, फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला लगाम, शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या अनुदानाचा प्रश्न, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने, सातारकरांच्या टोल माफीसाठी केलेले जबरदस्त प्रयत्न यामुळे सातारा तालुक्यात शिवसेनेचा एक चेहरा तयार झाला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मातोश्री येथे जाऊन थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
मात्र ऐनवेळी ठाकरे गटाने राष्ट्रवादीतून आलेल्या अमित कदम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सचिन मोहिते हे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी ती नाराजी जाहीर न करता पक्षादेश मानून अमित कदम यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावत शिवसेनेची एकजूट दाखवली. मात्र शनिवारी अचानक त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत फलटण येथे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये एका जाहीर मेळाव्यात प्रवेश केला. महाविकास आघाडीला त्यामुळे सातार्यात खिंडार पडले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार असणारे अमित कदम यांच्या प्रचार यंत्रणेला यामुळे धक्का बसलेला आहे.
सातारा व जावली तालुक्यातील शिवसैनिक या घटनेने संभ्रमित झाले आहेत. या संदर्भात शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रियांसाठी उपलब्ध झाले नाहीत.
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत! |
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी |
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे |
आ. शिवेंद्रराजेंच्या विजयात परळी भागाचा सिंहाचा वाट असेल |
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
शिवसेना सोडून जाणार्या गद्दारांना भीक घालत नाही |
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण |
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र |
मुंबईस्थित सातारा-जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध |
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |

छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे |
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल |
निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? |
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |